उद्या केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापुर दौऱ्यावर……

केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उद्या १२ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त हातकणंगले तालुक्यातील वडगाव गावाची निवड केली असून ते विविध शासकीय योजनाची माहिती देणार आहेत.

शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. यावेळी शेतकऱ्यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. तरी भागातील सर्व लाभार्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांनी केले आहे 

यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजप नेते दलितमित्र अशोकराव माने, तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष अविनाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, चिटणीस आनंदा थोरवत, रावसाहेब चौगुले, आनंदा पोवार, अमोल झांबरे, ज्ञानेश्वर ढेरे, अमर थोरवत, शप्पीक हजारी, आजमुद्दीन हजारी उपस्थित होते.