आयुष्मान भारत योजना! सरकारने बदलले हे नियम

गेल्या काही वर्षांपासून सरकार आयुष्मान भारत योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लोकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतो. मात्र आता सरकारने या योजनेच्या काही नियमामध्ये बदल केला आहे ज्याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

सरकारने नुकतीच एक यादी जारी केली आहे, या यादीमध्ये आयुष्मान भारत योजनेत यापुढे कोणते आजार समाविष्ट केले जाणार नाहीत हे सांगण्यात आले आहे.

या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना “आयुष्मान कार्ड” प्रदान केले जाते. या कार्डद्वारे, योजनाधारकास 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात, जे योजनेअंतर्गत सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.

आता कोणत्या रोगांचा समावेश होणार नाही?

या योजनेतून सरकारने 196 आजार खाजगी रुग्णालयातील उपचारातून काढून टाकले आहेत. मलेरिया, मोतीबिंदू, सर्जिकल डिलिव्हरी, नसबंदी आणि गॅंग्रीन यांसारखे आजार यापुढे या योजनेच्या फायद्यांचा भाग नाहीत. सरकारच्या या निर्णयाचा आता जनतेवर खोलवर परिणाम होणार आहे.