अलीकडे चोरीच्या प्रमाणात खूपच वाढ होत आहे. बंद घरे दिसली की चोरटे त्यावर डल्ला मारित असतात. अशीच एक चोरीची घटना हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे घडली आहे. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि रोकड असा दोन लाख 24 हजारांचा ऐवज लंपास केलेला आहे.
याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात संजय सुधाकर पवार यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय पवार हे कोरोची येथे कुटुंबासह राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा अनिकेत पुण्यामध्ये काम करतो अनिकेतच्या विवाहासाठी पवार कुटुंबीयांनी बँकेतून 79 हजार रुपये काढून ही रक्कम घरातील दागिन्यांसोबत लाकडी कपाटामध्ये ठेवली होती.
पवार यांची पत्नी माहेरी गेल्या होत्या आणि संजय यांची रात्रपाळी असल्यामुळे यांच्या घरामध्ये कोणीच नव्हते आणि हीच संधी चोरट्यांनी साधली आणि त्यांनी घरफोडी करून कपाटातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि 74 हजारांची रोकड लंपास केली आहे.