उद्यापासून हेरलेत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव!

हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे १ ते ५ मे दरम्यान श्री १००८ भगवान चंद्रप्रभू मानस्तंभ द्विद्वादश वर्षपूर्तीनिमित्त एवं नवनिर्मित श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान मुनिस्रुव्रतनाथ तीर्थंकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव होत आहे.महामहोत्सव आचार्य विशुद्धसागर मुनिमहाराज व ससंघ (२९ पिंच्छी) यांच्या सान्निध्यात व नांदणी मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या अधिनेतृत्‍वाखाली व स्वतिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत होणार आहे.प्रतिष्ठाचार्य संजय उपाध्ये व डॉ. सम्मेद उपाध्ये हे पूजेचे विधी करणार आहेत.

यासाठी मुख्य इंद्र सौधर्म इंद्र इंद्रायणी म्हणून श्री. व सौ. सुरेश चौगुले आणि तीर्थंकर माता-पिता म्हणून श्री. व सौ. नेमगोंडा पाटील हे आहेत. पाच दिवसांत अनेक मंडप उद्‍घाटन, ध्वजवंदन, कलश स्थापना, अखंड दीप प्रज्वलन यांसह अनेक धार्मिक विधी, विधान, मंगल प्रवचन, गर्भसंस्कार, मौजीबंधन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. सर्वांनी उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.