19 जानेवारीला सोलापूर बंदची हाक

आता सद्या यात्रेचा सीजन हा सर्वत्र सुरू आहे. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने लोक उपस्थित देखील राहतात आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील या यात्रा उत्सवांमध्ये केले देखील जाते.

तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेपूर काळजी देखील घेतली जाते. श्री सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा आरोप राष्ट्रीय लिंगायत महामंचने केला आहे.

सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील नंदिध्वज मिरवणुकीदरम्यान बैलगाडी रथामध्ये सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेशेजारी महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली होती. मात्र, काही जणांनी जाणीवपूर्वक महात्मा बसवेश्वरांचा फोटोला पेपरने झाकून ती प्रतिमा काढून टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय लिंगायत महामंचने केला आहे.

संबंधित विटंबना करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करा अन्यथा 19 जानेवारीला सोलापूर बंद ठेवणार असा इशारा राष्ट्रीय लिंगायत महामंचने दिला आहे.