देशात सर्वत्र सोशल मीडियाचा खूपच हाहाकार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण खूपच प्रसिद्धीस देखील आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजेच सोशल मीडिया. या सोशल मीडियावर प्रत्येक जण अगदी उत्सुकतेने पाहत असतो. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली सोशल मीडियावरील कमांड बळकट करण्याकडे लक्ष दिले आहे.
ज्यांच्या हातात सोशल मीडियाची पॉवर आहे, त्यांच्याकडे तरुण आणि मध्यमवर्गीय मतदार आकर्षित होताना दिसत आहे.त्यातच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने सोशल मीडियावरील वावर वाढवला आहे. माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना सोशल मीडियात आपली ताकद बनू शकते, असे सांगत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पाच वर्षांपूर्वीच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या प्रत्येक मेळाव्याची माहिती, भाषणे विरोधकांच्याही आरोप-प्रत्यारोपांच्या प्रत्येक फायली स्टोअर करीत सोशल मीडियावर वेगळा ट्रेंड सुरू केला आहे.
सोशल मीडिया हे आगामी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एक प्रभावीपूर्ण अस्त्र आहे तसेच अगदी सामान्यातल्या सामान्य जनतेवर देखील त्याचा खूप मोठा प्रभाव पडतो हे ओळखून कार्यकर्त्यांना वापराबाबत सूचना केल्या आहेत अशी माहिती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिली.