हातकणंगले तालुक्यातील नरंदेत हॉटेल व्यावसायिक रोहित कुंभार युवकाची आत्महत्या

नरंदे येथील रोहित रामचंद्र कुंभार याने स्वत:च्या हॉटेल कुंभारवाडा नावाने असलेल्या किचनच्या कौलारु शेडमधील वाश्याला मफलरने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद मयताच्या भाऊ सचिन रामचंद्र कुंभार याने हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मयत रोहित कुंभार याचे हॉटेल कुंभारवाडा नावाचे नागनाथ मंदिराजवळ भंडारी यांच्या माळावर हॉटेल होते. तो उत्तम आचारी होता. सर्वांशी आपुलकीने वागत असल्याने त्याचे हॉटेल अल्पावधीतच नावारूपास आले होते. याबाबतची फिर्याद सचिन रामचंद्र कुंभार यांनी हातकणंगले पोलिसांत दिली आहे. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.