सोलापूर जिल्हा दुष्काळी भाग म्हणून जगभरात नाव आहे. कारण या भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असते. तसेच या सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबे देखील खूपच प्रसिद्ध आहेत. अशा या सोलापूर जिल्ह्याचे नाव सोलापूरच्या सुकन्येने उंचावले आहे. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या महिला संघाची कर्णधार साक्षी वाघमोडे हिची महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. यासंदर्भातील माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बुर्स यांनी दिली.
साक्षी ही सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या महिला संघाची कर्णधार होती. तिने तिचे आंतरजिल्हा सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची निवड झाली ती पूर्वी महाराष्ट्र १९ वर्ष वयोगटातील संघात होती. ती पुढील सामने खेळण्यासाठी पुण्याहून लखनौला रवाना होत आहे. साक्षी ही बिहार, हिमाचल, आसाम, केरळ मध्य प्रदेश व चंदीगड या राज्यांशी होणारे सामने खेळणार आहे.
साक्षीच्या निवडीचे सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते – पाटील व अध्यक्ष दिलीप माने, श्रीकांत मोरे, धैर्यशील मोहिते- पाटील यांनी कौतुक केले आहे. दरम्यान, सोलापुरातील उत्कृष्ट क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी याची यापूर्वीच आयपीएल संघात निवड झाली आहे. सोलापूरचे खेळाडू देशपातळीवर चमकत असल्याने सोलापूरचे नाव सातासमुद्रापार होत असल्याचे क्रिकेट असोसिएशनचे मत आहे.