श्री रामांसाठी बनवा घरच्या घरी हा खास नैवद्य!

मित्रानो २२ जानेवारीला अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर तुम्ही घरच्या घरी श्री रामांसाठी हा खास नैवद्य अवश्य बनवा. सुंठवडा हा पदार्थ काजू, बदाम, पिस्ता, आणि खोबरे पासून बनवला जातो. हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

सुंठवडा हा स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. भारतात विविध ठिकाणी सुंठवडा हा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. सुंठवडा हा पदार्थ गोकुळ-अष्टमीला मोठ्या प्रमाणानात बनवला जातो, आणि यांचा उपयोग प्रसाद म्हणून केला जातो. हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे.

आपण हॉटेल किंवा बेकरीवरती पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि गोड सुंठवडा खायला मिळतो. सुंठवडा खूप कमी वेळात आपण घरीच बनवू शकतो. काही लोकांना सुंठवडा खूप आवडतो पण त्याचा परिसरात स्वादिष्ट सुंठवडा मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने गोड सुंठवडा कसा बनवतात यांची रेसिपी आता आपण पाहणार आहोत.

सुंठवडा हा एक स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे, विविध ठिकाणी सुंठवडा हा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. सूंठवड्याचे जास्त प्रकार नाहीत, यामध्ये आपण तीळ, काजू, बदाम, खोबरे, पिस्ता यापासून सुंठवडा बनवू शकतो.

आज आपण सुंठवडा 5 व्यक्तिकरिता बनवण्याची रेसिपी पाहणार आहे. सुंठवडा तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर सुंठवडा बनवू शकतो, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो. तसेच सुंठवडा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो. म्हणजेच आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

सुंठवड्यासाठी लागणारे साहित्य

1) 150 ग्रॅम खोबरे.
2) 50 ग्रॅम बदाम.
3) 50 ग्रॅम काजू.
4) 100 ग्रॅम खारीक.
5) 1 चमच सुठ पावडर.
6) 1 चमच बडीशेप.
7) 100 ग्रॅम खडीसाखर.
8) 50 ग्रॅम मनुका, पिस्ता.

सर्वात प्रथम खारीक मधील सर्व बिया काढून घ्या आणि एका भांड्यात काढून घ्या. नंतर खोबरे बारीक खिसून घ्या. नंतर गॅसवरती एक खोल तळाचा पॅन ठेऊन, गरम करा, पॅन गरम झाला की यामध्ये प्रथम बारीक खोबरे भाजून घ्या, नंतर बडीशोप भाजून एका प्लेटमध्ये काढा. नंतर काजू, बदाम आणि पिस्ता व्यवस्थित भाजून घ्या, आणि मिक्सर मधून बारीक करून घ्या. सर्व साहित्य चांगल्या प्रकारे भाजावे.

नंतर मिक्सर मधून खारीक मध्यम बारीक करून घ्या, आणि एका प्लेटमध्ये मध्ये काढा. नंतर बडीशोप आणि साखर मिक्सर मधून पूर्ण बारीक करून घ्या, आणि एका भांड्यात काढा. आता एका भांड्यात सर्व बारीक केलेले साहित्य काजू, बदाम, पिस्ता, खोबरे, साखर आणि थोडी सुंठ पावडर टाका. आणि चांगले मिसळून घ्या, पूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करा.

नंतर हा सुंठवडा एका मोठ्या वाटीत काढा, आणि त्यावर थोडे तुलसीचे पाने ठेऊन सजवा. आता आपला गोड आणि स्वादिष्ट सुंठवडा खाण्यासाठी तयार आहे. आपण एका छोट्या वाटीत घेऊन सुंठवडा खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

सुंठवडा सेवन केल्याने आपल्याला एंटीऑक्सीडेंट हा घटक काजू, बदाम मधून मोठ्या प्रमाणावर मिळतो. यामुळे आपल्याला कॅन्सर रोग होत नाही, आपले शरीर निरोगी राहते. यामध्ये असणारे कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन यामुळे आपले डोळे, हाड, त्वचा आणि केस चांगले राहतात.

सुंठवडा हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यातील सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत. सुंठवडा आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपण आजारी पडू शकतो.म्हणून सुंठवडा आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.