वडगावमध्ये देवांग मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात!

मकर संक्रांत म्हंटल की महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो. कारण मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. घरोघरी हळदीकुंकूचा कार्यक्रम होतो.

अनेक प्रकारचे वाण देखील दिले जाते. महिलावर्ग अगदी नटून थटून आनंदाने हसत खेळत हा कार्यक्रम करीत असतात. अगदी वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपणाला पहावयास मिळतो.

तर वडगावमध्ये मकर संक्रांतिनिमित्त चौंडेश्वरी महिला समितीच्या वतीने असाच महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम देवांग मंदिरात बुधवारी अगदी उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमास चौंडेश्वर महिला समितीच्या वतीने महिलांना वान, हळदीकुंकू, ओटी व अल्पोभार देण्यात आला. यावेळेस 242 महिला या कार्यक्रमात उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला. हा कार्यक्रम पुढील सात दिवस चालणार आहे. चौंडेश्वरी महिला समितीने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून हा कार्यक्रम पार पाडला. यावेळी कार्यक्रमात महिला समितीच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.

हा कार्यक्रम पार पाडणे साठी समाजाचे अध्यक्ष श्री सचिन शशिकांत लोले, उपाध्यक्ष श्री योगेश नारायण तारळेकर, खजिनदार श्री महेश किसन भंडारे, संचालक श्री अनिल मकोटे, कृष्णात गळंगे, नितीन लोले, देवदुत लोले, अमोल मकोटे, बाबासाहेब निवळे तसेच महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमती हेमलता मुसळे, उपाध्यक्षा सौ अनिता बुचडे, खजिनदार सौ शैलजा सतिश ठाणेकर, सौ सुजाता बसागरे, सौ प्रिया लोले, सौ संगिता गळंगे, सौ.शुभांगी भंडारे, सौ.अनुराधा गणपते,सौ. सुनिता मकोटे,सौ. संजिवनी लोले, सौ.सुनिता गांजवे, श्रीमती अलका वारे आदी समाज बांधव,भगिनीचे सहकार्य लाभले.