आता थोड्याच दिवसात दहावी बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची, पालकांची, शिक्षकांची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होण्याआधीच विभागीय मंडळांने शाळांना इशारा दिलाय. काही ठिकाणी पुरेशा सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बाकाऐवजी जमिनीवर बसविले जाते.परंतु तसे आढळून आल्यास त्या शाळेचे वेतन अनुदान थांबविण्यात येईल, असा इशारा विभागीय मंडळाच्या वतीने शाळांना दिलाय.
यंदा विभागातील दहावीला सुमारे १ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तर बारावीला १ लाख ७६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. शिवाय प्रॅक्टिकल परीक्षेचे मार्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्यात. दहावी किंवा बारावीचं वर्ष म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष असतं.
अशात काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थांची मोठी गैरसोय होते.या आधी काही विद्यार्थ्यांना परीक्षेला शाळेत बसण्यासाठी बाकांची व्यवस्था नसल्याने खाली बसावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. खाली बसणे, किंवा परीक्षा केंद्रावर पाणी आणि शौच्छालयाची योग्य सोय नसणे अशा समस्यांमुळे विद्यार्थांना पेपर देताना अडथळे येतात.
त्याचा थेट परीणाम त्यांच्या परीक्षेवर होतो. परिणामी डिस्टर्ब झाल्याने जास्त अभ्यास करूनही काही विद्यार्थांना समाधानकारवर पेपर लिहिता येत नाही.विद्यार्थ्यांची होणारी गौरसोय लक्षात घेता विभागीय मंडळांने शाळांना याबाबत इशारा दिलाय.
कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांची अशी गैरसोय होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ संबंधित शाळेचे वेतन अनुदान थांबविण्यात येणार आहे.