2024 वर्षाला नव्या उत्साहात सुरूवात झाली आहे. नव्या वर्षाचा आनंद द्विगुणीत करणारा नव्या वर्षाचा पहिला सण लवकरच येणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातूनही नवीन वर्ष अनेक अर्थांनी खास आहे. वर्षाचा पहिला महिना जानेवारी असतो आणि या महिन्यात अनेक उपवास आणि सण असतात. यातील मकर संक्रांत हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे.
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसारही हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे मकर संक्राती जल्लोषात साजरी केली जाते. गुजरातमध्ये केवळ तिळगुळ देऊन नाहीतर अनेक पारंपरिक पदार्थ आणि पतंगबाजीची स्पर्धा भरवून हा मकर संक्रांती साजरी केली जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या मते, जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याची मकर संक्रांती येते.
वर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत हा मोठा सण असेल. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते, असा समज आहे. 2024 मध्ये मकर संक्रांतीचा सण कधी आहे आणि या सणावर स्नान आणि दान करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे हे आपण जाणून घेऊया.
ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की ज्योतिषशास्त्रीय मकर संक्रांतीचा सण 2024 मध्ये 15 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. तो दिवस पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी आहे आणि तो दिवस सोमवार आहे.
15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 वाजता आहे. त्यावेळी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सुमारे महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील. याचा परिणाम जनजीवनावर होणार आहे.मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी 07:15 ते 09:00 पर्यंत आहे.
यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करावे. त्या दिवशीचा महापुण्यकाळ 1तास 45 मिनिटांचा असतो. शुभ काळातही मकरसंक्रांतीला स्नान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीचा शुभ काळ 10 तास 31 मिनिटांचा असेल. मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी 7.15 ते सायंकाळी 5.46 पर्यंत आहे.