हातकणंगले लोकसभा मतदारसंघसाठी ….

आगामी लोकसभा निवडणुका कधीही होऊ शकतात. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. प्रशासनही या तयारीत मागे नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघसाठी प्रशासनाने आतापासूनच तयारीला वेग दिला आहे.

प्रत्येक गोष्टीचा आणि लागणाऱ्या साहित्यांच्या गोष्टींचा आढावा घेऊन या दोन्ही मतदारसंघांत 18 हजार कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर नियोजन सुरू आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांसाठी तब्बल 18 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन करावे लागणार आहे. यासाठी शासनाच्या सर्वच पातळ्यांवर धावपळ सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर Kolhapur जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.

मतदान केंद्राधिकारी, निरीक्षकांसह इतर आदेश दिले जात आहे. दरम्यान, लोकसभेसाठी एकूण किती अधिकारी आणि कर्मचारी लागतील, यापूर्वी किती लोक होते, मतदान केंद्रे किती असावीत, अशी सर्व पातळ्यांवर चर्चा केली जात आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्‍यक असणाऱ्या अधिकारी किंवा राखीव कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता सध्या 18 हजारांहून अधिक लोकांची आवश्‍यकता आहे.त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यांना किंवा कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणती जबाबदारी दिली जाऊ शकते, त्यांनी यापूर्वी निवडणुकीसाठी काम केले आहे का? याची चाचपणी सुरू आहे. यातून सुमारे 18 हजार अधिकारी आणि कर्मचारी लागतील, असा निष्कर्ष काढला आहे.