विट्यामध्ये श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बायोलॉजी कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा खूपच चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी संरक्षित केलेले मानवी अवयव प्रत्यक्ष हाताळणीची या विद्यार्थ्यांना संधी मिळाली. या वर्कशॉपच्या माध्यमातून डॉ. विशाल मगदूम यांनी राजलक्ष्मी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या काही टिप्स देखील दिल्या.
मानवी अवयवांचे महत्त्व आणि ओळख पटवून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच डॉक्टर विशाल मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे बेसिक क्लियर करण्यासाठी मार्गदर्शन केले.
नीट परीक्षेच्या दृष्टिकोनातून मानवी हृदय, मेंदू किडनी यांसारखे अवयव विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष हातात दाखवून तज्ञ डॉक्टरांनी सखोल मार्गदर्शन केले.