भारतीय सोशल मीडिया, विशेषत: इन्स्टाग्राम, हे एआय जनरेट केलेल्या ऑडिओ आणि गाण्यांसह एडिटेड व्हिडीओजनी भरलेलं आहे. हा ट्रेंड इतका लोकप्रिय आहे की त्यातून अनेक लोकप्रिय व्यक्तींचीही सुटका होत नाही. दररोज आपल्याला त्यातून नवे काही ‘रिलीज’ ऐकायला मिळतात, जे अनेकदा एआय टूल्स वापरून प्रसिद्ध व्यक्तींच्या आवाजात तयार आणि शेअर केले जातात. याशिवाय या जगातून निघून गेलेल्या कलाकारांच्या आवाजातील गाणी पुन्हा तयार करण्यासाठी लोकांनी AI चा वापर केला आहे.
गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही त्यांचा अवीट गोड आवाज आणि त्यांची गाणी लाखो रसिकांच्या स्मरणात आजही आहेत. अलीकडेच, सोशल मीडियावर एक मोहक क्लिप प्रसारित झाली , गानकोकिळा, दिवंगत गायिका, लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘राम आएंगे तो अंगना सजाऊंगी’ या गाण्याचे व्हायरल रिक्रिएशन दाखवण्यात आले होते. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या दरम्यानच रिलीज झाल्याने हे भजन आणि ती क्लिप खूप व्हायरल आली आहे.
अयोध्येतील राम मंदिराचा आज उद्घाटन सोहळा असून काही तासांतच प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार या निमित्ताने गाणी लिहित आणि गात आहेत. त्याच दरम्यान, लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन खूप व्हायरल होत आहे. AI ने लता मंगेशकर यांच्या आवाजात राम भजन सादर केले आहे. हे राम भजन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन लोकांना प्रचंड आवंडल असून अप्रतिम अशीच दाद रसिक श्रोत्यांकडून मिळत आहेत.