अल्पवयीन पत्नी गर्भवती! इस्लामपूर न्यायालयाने सुनावली शिक्षा

परजिल्ह्यातून वाळवा तालुक्याच्या एका गावातील नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहिलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून बलात्कार केल्याच्या खटल्यातील आरोपीस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी २० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

वैभव नंदकुमार लोंढे (२४, रा. बोरगाव, ता. वाळवा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी धरून शिक्षा दिली.

त्याने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. आरोपीविरुद्ध फिर्याद देतेवेळी पीडित मुलगी ही पाच महिन्यांची गरोदर राहिली होती. फिर्यादीतर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले.या