इचलकरंजीतील नाईट कॉलेजच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड


इचलकरंजी वस्त्र नगरी म्हणून सगळीकडे ख्याती आहेच. अशातच अनेक शाळा मार्फत अनेक विद्यार्थी आपले नाव इचलकरंजी येथील देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्समधील पाच खेळाडूंची निवड शिवाजी विद्यापीठ संघात झाली. यामध्ये कॉलेजच्या ओमकार कुंभार यांनी नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये पंधराशे मीटर धावणे या खेळ प्रकारात सुवर्णपदक तर ८०० मीटर धावणेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेमध्ये चार खेळाडूंची निवड झाली.


यामध्ये अर्णव पाटणकर, सुशांत हजारे, आदित्य कांबळे व वैभव निप्पाने यांचा समावेश आहे. या
यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अरुण खंजिरे, प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुरदंडे, सेक्रेटरी शेखर पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.