इस्लामपुरात आज दलित महासंघाचा आक्रोश मोर्चा!

पुरोगामी महाराष्ट्रात दलित लोकांवर महिलांवर अन्याय अत्याचाराची घटना वाढत आहेत. दलित लोकांवर सातत्याने वाढत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने शनिवार, दिनांक रोजी इस्लामपुरात प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ.सुधाकर वायदंडे यांनी दिली. हा मोर्चा तहसीलदार कार्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून प्रमुख मार्गावरील प्रांत कार्यालयावर येणार आहे.