जागतिक महिला दिनानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयातील शिबिरात २ हजार २८९ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरदास, डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. सचिन भंडारी व कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा रुग्णालयात हे शिबिर घेण्यात आले.
यावेळी २ हजार २८९ महिलांची हृदयरोग, मधुमेह व सर्व कर्करोग तपासणी करण्यात आली. कर्करोगाच्या २५ संशयित महिला शोधून पुढील औषधोपचार करणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी वाळवा डॉ. प्रवीण पाटील यांनी दिली.