पहिल्याच दिवशी इतक्या लाख भाविकांनी घेतलं रामललाच दर्शन

अयोध्येत सोमवारी रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर मंगळवारी मंदिर भाविकांसाठी अधिकृतपणे खुल झालं. दर्शनासाठी मंदिर खुल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठा रेकॉर्ड झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी आपल्या आराध्य देवतेच दर्शन घेतलं. काल प्रचंड गर्दी झाली होती. अयोध्येतून जे व्हिडिओ समोर आले, त्यात चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती.

अयोध्येत भक्तांची गर्दी वाढत होती. त्यामुळे प्रशासनाला तात्काळ अयोध्येत वाहन बंदीचा निर्णय घ्यावा लागला. एका व्हिडिओमध्ये तर भाविक सुरक्षाकड भेदून मंदिराच्या दिशेने पळत होते. काहींना किरकोळ दुखापती झाल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधूनच लाइव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधी उच्च अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं. त्यानंतर स्वत: तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. भक्तांच्या सुविधेसाठी आठ ठिकाणी सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलय. मंदिर खुल झाल्यानंतर पहिल्याचदिवशी पाच लाख भाविकांनी रामललाच दर्शन घेतलं.

अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी गर्दी वाढत होती. त्यामुळे तात्काळ प्रभावाने गाडया रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बाराबंकी पोलिसांनी भाविकांना पुढे न जाण्याच आवाहन केलं. बाराबंकी अयोध्येपासून 100 किमी अंतरावर आहे. आज दुसऱ्यादिवशी सुद्धा भाविक रामललाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.