शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत आरोग्य योजनेचा लाभ……

राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येईल, असा निर्णय यापूर्वीच झाला असताना आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड शुभ्र शिधापत्रिकाधारकांना बनवून घ्यावे लागणार आहे.यासाठी ही शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत संलग्न करणे बंधनकारक असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

त्यानुसार या शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत संलग्न करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि सर्व उपसंचालक शिधावाटप यांना देण्यात आले आहेत.