आता सर्वत्र यात्राचे वातावरण आहे. वेगवेगळ्या देवी देवतांच्या यात्रांचा उत्सव सगळीकडेच सुरू आहे. सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध असलेली श्री मांढरदेवी काळुबाई उत्सवास हलदहिवडी येथे उद्यापासून सुरुवात होणार आहे.
पौष पौर्णिमेच्या दिवशी श्री मांढरदेवी काळुबाई वाद्याच्या गजराचे श्रीदेवीची यात्रा स्थळाचे मुख्य आकर्षण आहे. या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. गुरुवार दिनांक 25 रोजी अभिषेक सोहळा आणि सकाळी सात ते नऊ या वेळेत होम हवन तसेच दुपारी बारा वाजता श्री काळुबाई मांढरदेवी श्री ची आरती त्यानंतर महाप्रसाद व गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
या यात्रेला सांगोला तालुक्यासह अनेक जिल्ह्यातील भाविक मोठ्या उत्साहाने श्री काळुबाईच्या मंदिरात हजेरी लावून नवस फेडत असतात.