खाजगी ट्रॅव्हल्सने विरुद्ध बाजूने येऊन एसटी बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थी , वाहकासह ११ प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवार , २२ रोजी सकाळी ७ च्या सुमारास घेरडी (ता. सांगोला ) गाव ओढ्याजवळ घडला. दरम्यान अपघातातील जखमी प्रवाशांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला.
याबात , एसटी चालक धनाजी भीमराव पवार (रा. वाकी घेरडी , ता. सांगोला ) यांनी फिर्यादी दिली असून, पोलिसांनी सिद्धनाथ ट्रॅव्हल्स क्रमांक एम .एच . ०१ / सी .व्ही . ९९११ वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सांगोला आगाराची एम . एच . १४ / बी . टी . ४७११ ही एसटी बस नराळे येथून सुमारे ३५ प्रवाशांना घेऊन घेरडी , जवळा मार्गे सांगोल्याकडे निघाली होती . सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास नेमकं त्यावेळी जावळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम. एच . ०१/ सी .व्ही . ९९१२ खाजगी ट्रॅव्हल्स वरील चालकाने विरुद्ध बाजूने येऊन एसटी बसच्या उजव्या बाजूला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला . जखमी प्रवाशांवर घेरडी व सांगोला येथे उपचार करण्यात आले.
