सोलापूरमधील राम भक्तांकडून अयोध्येत 45 दिवस भंडारा

अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना झाली. या दिवशी गावोगावी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते. प्रत्येक जण हा रामांच्या जयघोषात अगदी रंगून गेलेला दिसून आला. अयोध्येतील राम मंदिर हे भाविकांसाठी दर्शनासाठी खुले झालेले आहे. भाविकांची असंख्य गर्दी आपणाला आयोध्यामध्ये पहावयास मिळत आहे.

इकडे लाखोच्या संख्येने राम भक्त प्राणप्रतिष्ठानंतर आयोजित दाखल झालेले असताना त्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र मधील सेवेकरी उत्साहाने अयोध्येत दाखल झाले आहेत. सोलापूर मधील समस्त हिंदू समाजाच्या वतीने अयोध्येत येणाऱ्या लाखो  राम भक्तांसाठी भंडाऱ्याचा आयोजन करण्यात आला आहे.

पुढील 45 दिवस  अयोध्येत हा भंडारा सुरू राहील. सोलापूर मधील 45 जण आळीपाळीने  अयोध्येत ही सेवा देणार आहेत. साधारणपणे चार ते पाच हजार राम भक्तांचे रोज या भंडाऱ्यातून पोट भरलं जाईल.