एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले होते कि, देशातील आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केलं होत. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही. राहुल गांधींच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे. राहुल गांधींच्या भूमिकेशी सहमत आहात का? असा सवाल करत आरक्षणासंदर्भातील भूमिकेवरून पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. तर राहुल गांधींनी देशाची गरिमा कमी केल्याचे काम केलं असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राहुल गांधींच्या मनातलं, पोटातलं ओठांवर आलं आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे त्यांनी देशाची गरिमा कमी केल्याचे काम केले आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, आपल्या संविधानाचा अपमान राहुल गांधींनी करायला नको होता. याबाबतीत त्यांनी खुलासा करायला पाहिजे, अशी मागणी करत पंकजा मुंडे म्हणाल्या राहुल गांधींच्या मित्र पक्षांनी देखील ते राहुल गांधी यांच्याशी सहमत आहेत का? याबद्दलचा स्पष्ट खुलासा केला पाहिजे, असे आव्हानच पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांना दिलं आहे.
Related Posts
इचलकरंजीतील रोटरी क्लब पाच पुरस्कारांनी सन्मानित…..
इचलकरंजी येथील रोटरी क्लब येथे अनेक उपक्रम राबविले जातात. अनेकजण या उपक्रमांमध्ये अगदी उस्फुर्तपणे सहभागी देखील होतात. इचलकरंजी येथील रोटरी…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार इतकी रक्कम
महाराष्ट्रात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. खरिपाची पिके (Unseasonal Rain) हातून गेलेली असताना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात…
50 हजार रुपयांचा iPhone 12 आता फक्त 23 हजार रुपयांमध्ये!
12 लाँच होऊन बराच काळ लोटला आहे. तरीसुद्धा हा फोन आत्ताही ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्हीसुद्धा हा फोन खरेदी करण्याचा विचार…