गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. पावसाळ्यात कमी पाऊस, हिवाळ्यात अधिक पाऊस अन कमी थंडी यामुळे शेतकरी बांधव मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत.पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
आधी कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आणि आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या अनेक पिकांचे नुकसान होत आहे.अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ? या संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात 5 फेब्रुवारी पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे या तिन्ही विभागात 25 जानेवारीपासून अर्थातच उद्यापासून थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.दुसरीकडे, मराठवाड्यात आज आणि उद्या ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
परंतु येथे अवकाळी पाऊस पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे.तसेच या विभागात 25 जानेवारी नंतर हवामान कोरडे होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम विदर्भमध्ये आज आणि उद्या ढगाळ हवामानाची शक्यता आहे.परंतु येथे देखील अवकाळी पाऊस बरसणार नाही. तसेच 25 जानेवारीपासून ते 5 फेब्रुवारी पर्यंत येथील हवामान देखील कोरडे राहणार आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे.या विभागातील वर्धा, नागपूर, रामटेक, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. पण, यानंतर येथील थंडी देखील वाढणार आहे. येथील हवामान देखील येत्या दोन दिवसात कोरडे होणार आहे.