टाटा वीज कंपनीने एप्रिलनंतर वीजदरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागेल. 2022-23 आणि 23-24 या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे.
एप्रिलनंतर घरगुती विजदर वाढण्याची शक्यता आहे. टाटा वीज कंपनीचा दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. टाटा कंपनी सोबत इतर विज पुरवठा करणाऱ्या कंपन्याही वीज दरात वाढ करण्याच्या विचारात आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांवर अधिक भार पडणार आहे. या प्रस्तावावर जनतेच्या सुचना हरकती मागवल्यानंतर विज नियामक आयोग यावर निर्णय घोणार आहे.
2022-23 आणि 23-24 या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.दरमहा सुमारे 300 किंवा 500 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना बिले पाठविणे आणि ती वसूल करणे, हे काम कठीण आणि जास्त खर्चिक असते. या पार्श्वभूमीवर 0-100 युनिटसाठी तब्बल 201 टक्के वाढ प्रस्तावित आहे. 100 ते 300 युनिटपर्यंत 60 टक्के आणि 301 ते 500 युनिटपर्यंत 10 टक्के वाढीचा प्रस्ताव पाठवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या प्रस्तावावर जनतेच्या सूचना व हरकती मागवल्या नंतर विज नियामक आयोग यावर निर्णय घेणार आहे.
उद्योग व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्वाचा वीजपुरवठा असून अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र उद्योग व्यवसाय उभारताना यामध्ये सवलत मिळण्याची मागणी योग्य आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संदर्भातील एक पॅटर्न आम्ही तयार करीत आहोत. याचा फायदा उद्योग समूहांना होईल. मात्र, मराठवाडा-विदर्भ यासारख्या मागास भागात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांनाच या पॅटर्नचा लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणताही उद्योग उभारण्यासाठी वीज, पाणी, मध्यवर्ती ठिकाण व अन्य पायाभूत सुविधांची गरज असते. केंद्रीय रस्ते, महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विदर्भातील रस्त्यांचे जाळे मजबूत व दीर्घकाळासाठी उत्तम झाले आहे. लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नागपूरला जगामध्ये पुढे आणायचे असल्याचे फडणवीस म्हणाले.