सांगोला या तालुक्यात दुष्काळ खूपच मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे प्रत्येकालाच खूपच संकटांना सामोरे देखील जावे लागते. पाण्याअभावी येथील शेतकरी काहीच करू शकत नाही. शेतकऱ्यांपुढे पाण्याअभावी खूप मोठे आव्हान डोळ्यासमोर उभे राहते. तर सांगोला येथे उद्या बुधवारी भव्य मेळावा होणार आहे.
हा भव्य महिला उद्योजकता मार्गदर्शन मेळावा आहे. कोळा जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय माजी सदस्य ॲड. सचिन देशमुख यांच्या संकल्पनेतून कैलासवासी ॲड. अशोकराव देशमुख युवा व क्रीडा मंच कोळी यांच्या वतीने सांगोला तालुक्यातील महिलांसाठी बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी सदानंद मराठी पर्पज हॉल येथे सकाळी अकरा वाजता मिरज रोड सांगोला येथे ग्रामीण महिला उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केलेले आहे अशी माहिती ॲड. सचिन देशमुख यांनी सांगितलेले आहे.
सांगोला तालुक्यातील महिलांनी बचतीच्या माध्यमातून बचत गटाची उभारणी करून अनेक नवीन संस्था उभ्या कराव्यात तसेच अनेक नवीन उद्योग चालू करावे या साठी या महिलांना मार्गदर्शन मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.