सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले (Hatkanangle) मतदारसंघ महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा झाला असतानाच आता महाविकास आघाडीने संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati on Loksabha Election) हालचालींवरून सूचक भाष्य केलं आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीतील पक्षांपैकी लढले तरच पाठिंबा देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे.
संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या स्वराज्य संघटनेतून लढले, तर मविआ पाठिंबा देणार नाही. महाविकास आघाडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील तीनपैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजी राजेंनी लढावं, तरच कोल्हापुरात लोकसभेला पाठिंबा देण्याची मविआची भूमिका आहे.