बजेटवरून सोशल मीडियात मीम्सचा पाऊस….

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केले. या बजेटमधून कोणाच्याच हाती काही ठोस लागले नाही. त्यामुळे मध्यमवर्गीय कमालीचा नाराज झाला आहे. या वर्गातील अनेकांनी सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करीत समाज माध्यमांवर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

हे बजेट कोणाच्याच फायद्याचे नाही. सर्वसामान्यांना केंद्र सरकारने ठेंगा दिला आहे. असे सांगत यूजर्सने ‘अब्बा, डब्बा’, जब्बा ते ‘तौबा, तौबा, तौबा सारा मूड खराब कर दिया’ आणि ‘हे काही बरोबर नाही’ अशा रिऍक्शन दिल्या आहेत.

बजेट वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर काहीच समजले नाही, असे सांगत एका यूजर्सने अभिनेता जॉनी लिव्हरचा फोटो शेअर करत ‘अब्बा, डब्बा’, जब्बा असे या फोटोला कॅप्शन दिले. एका युजरने ‘अरे कहना क्या चाहते हो’, तसेच ‘तौबा, तौबा, तौबा सारा मूड खराब कर दिया’ तर अन्य एका यूजरने राजकुमार राव यांचा फोटो शेअर करत त्यावर ‘ठेंगा’ असं भलं मोठं अक्षर लिहिलं आहे.

अजय देवगनचा एक संवाद शेअर करत एका युजरने काहीच बदललं नाही, आजही सर्व काही तसेच आहे, असं म्हटलं. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात न आल्याने एका यूजर्सने संताप व्यक्त करत म्हटलं, ‘जैसा चल रहा है, वैसा चलने दो’, तर इंस्टाग्रामवरचा अथर्व सुदामे याचा प्रसिद्ध डायलॉग ‘हे काही बरोबर नाही’ यासारखे मीम्स शेअर करत केंद्रातील मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.