Women T20 World Cup 2024: 3 ऑक्टोबरपासून रंगणार टी-20 विश्वचषकाची स्पर्धा! महिला टी-20 विश्वचषक 2024 चे संपूर्ण वेळापत्रक

महिला टी-20 विश्वचषक 2024 युएई (दुबई)मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.  3 ऑक्टोबरपासून या महिला टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. यंदा ऑस्ट्रेलिया आणि भारत प्रबळ दावेदार मानले जात आहे. 3 ऑक्टोबरपासून आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या (Women T20 World Cup 2024 Schedule) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. 4 ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंडचा संघ एकमेकांसोबत भिडणार आहे.

महिला टी-20 विश्वचषकाची स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून त्यांच्यामध्ये अंतिम फेरीसह 23 सामने खेळवले जाणार आहेत. या 10 संघांची प्रत्येकी पाचच्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताबाबत बोलायचे झाले तर त्याचा समावेश अ गटात करण्यात आला असून त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना दुसऱ्या गटात ठेवण्यात आले आहे.

गटवारी

Group A: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर संघ-1

Group B: दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर संघ-2

महिला टी-20 विश्वचषक 2024चे संपूर्ण वेळापत्रक-

3 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
3 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजा
4 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
4 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
5 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजा
5 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजा
6 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
6 ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
7 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजा
8 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजा
9 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
9 ऑक्टोबर : भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
10 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजा
11 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई
12 ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजा
12 ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई
13 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
13 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा
14 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
15 ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
17 ऑक्टोबर : उपांत्य फेरी 1, दुबई
18 ऑक्टोबर : उपांत्य फेरी 2, शारजाह
20 ऑक्टोबर : फायनल, दुबई