लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा

सद्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष आपली मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावरील तयारी सुरू झाली आहे. आचारसंहितेनंतर निवडणुकीच्या तयारीसाठी साधारणत: ३० ते ३५ दिवस लागतात.

आता पहिल्यांदा मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण झाले असून दुसऱ्या टप्प्यात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे.आचारसंहिता जाहीर झाल्यावर २३ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.

सोलापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जवळपास २३ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांची यादी अंतिम झाली असून वर्ग एक ते तीन कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.