गुंतवणूक केलेल्या पैशाच्या मागणीसाठी येथील ‘त्या’ ठकसेनाच्या दारात गुंतवणूकदारांनी मारलेला ठिय्या आज पाचव्या दिवशीही सुरूच होता.दरम्यान, रक्कम परत मागण्यासाठी त्या ठकसेनाकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढत चालला असून, आज उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच ते सहा जणांनी येथे धाव घेतली. यामध्ये एका गुंतवणूकदाराच्या विधवा पत्नीचा समावेश होता.
यावेळी त्यांची त्या ठकसेनाच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर वादावादी झाली.गुंतवणूक केलेले पंधरा ते वीस जण रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी अंथरूण पांघरूणसह कडाक्याच्या थंडीत ते ठकसेनाच्या दारात बसून आहेत. पसार असलेल्या ठकसेनाने पैसे देण्याबाबत अद्याप दाद दिलेली नाही.