राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महायुती सरकारचा शपथविधी नुकताच मुंबईतील आझाद मैदानावर पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.यानंतर आता आमदारांच्या शपथविधीसाठी शनिवारपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु होणार आहे. शनिवारी आणि रविवारी 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल. एकीकडे मुंबई येथे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना आमदार जयंत पाटील मात्र इस्लामपूर मतदारसंघातील जयंत पाटील विविध नैमित्तिक कार्यक्रमास उपस्थिती लावत कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसून आले.
विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी अद्याप जाहीर भूमिका घेतलेली नाही. त्यांचे सध्याचे मौन ही वादळापूर्वीची शांतता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.शरदचंद्र पवार पक्षाची पिछेहाट झाली. तेव्हापासून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पाटील यांची भूमिका काय असेल,
यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. परंतु, यावर त्यांनी कोणतीही जाहीर भूमिका अद्याप घेतलेली नाही.
तसेच, विधानसभेतील पक्षाची जबाबदारीही घेतलेली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड व मुख्य पक्षप्रतोद म्हणून युवा आमदार रोहित पाटील यांची त्यांनी निवड जाहीर केली. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघातील आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांत मात्र चलबिचल सुरू झाली आहे.