आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राज्य सरकारचा निर्णय..

भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जागेवरुन वाद निर्माण झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी दोघांना उल्हानगर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. त्यावेळी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर खळबळ उडाली. राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला. आता आणखी एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता पोलिसांना सर्वच जणांच्या बंदुकीचे लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.