राऊतांनी अजित पवारांना आरसा दाखवला..

अजित पवार इतके निर्दयी होतील, असं मला वाटल नव्हतं… ज्या शरद पवारसाहेबांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं. आपल्याला वाढवलं. प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याच्याच बाबत तुम्ही अशी वक्तव्य करणं योग्य नाही. या नव्या कळपात गेल्यापासून आपण लांडग्यांच्या भूमिकेत गेलेला आहात. त्यांना मी वाघाची भूमिका म्हणणारच नाही. कारण वाघाला काळीज असतं. शरद पवारांशी आपले राजकीय मतभेद असू शकतात. पण तुम्ही आज जे काही आहात. तुम्ही जे सुखाचे चार घास खात आहात. ते पवारांमुळे…, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे.

शरद पवारांनी एवढं मोठं सम्राज्य उभं केलं नसतं तर तुम्ही कुठे असता? अजित पवार तु्म्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवर फिरत होतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. आज तुम्ही जे आहात ते शरद पवारांमुळे… पण माणसाने इतकं कृतघ्न असू नये, असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.