सांगोला मंगळवेढा हा दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो. पाण्याअभावी येथील जनतेचे खुपच हाल होतात. महाराष्ट्र आम्हाला साधे पाणी देऊ शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात जाणार अशी भूमिका मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांनी घेतली आहे, या गावातील लोकांनी आता थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याने खळबळ उडाली आहे.
मंगळवेढ्याचे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी कोणालाही कर्नाटकात जायची गरज पडणार नसून, महाराष्ट्र न्याय देईल अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र आता संतप्त झालेल्या या २४ गावातील शेतकरी आणि पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ‘ना प्यायला पाणी, ना शेतीला पाणी’ अशी अवस्था आमच्या पिढ्यान पिढ्या भोगत असताना अजून किती वेळ न्यायासाठी वाट पहायची? अशा भूमिकेवर हजारो शेतकरी आले आहेत.