कोल्हापूर महापालिका शाळांतील मुले ‘इस्रो’ला रवाना..

महापालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वीमधील 17 विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले. त्या विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (खडठज) अभ्यास दौर्‍यासाठी महापालिकेने निवड केली.

प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ही संकल्पना राबविली. सोमवारी सर्व विद्यार्थी विमानाने बंगळूरमधील ‘इस्रो’कडे रवाना झाले. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद लुटला. त्यांच्यासाठी हा अभ्यास दौरा अविस्मरणीय ठरला आहे.