पोलिसांच्या घरांसाठी १९ कोटींचा निधी! आमदार डॉ. कदम

जनतेसाठी सतत सरकार कायमच कार्यक्षम असतातच. अनेक नवनवीन उपक्रम राबवीतच असतात. अलीकडे आमदार डॉ. कदम यांनी घोषणा केलेली आहे. कडेगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसाठी घरांच्या विषयाबाबत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्याअंतर्गत या पोलिसांसाठी ५९ निवासस्थाने मंजूर झाली असून, त्यासाठी १९ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी कडेगाव येथे दिली.

आमदार डॉ. कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव, तालुक्यासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी काम करीत आहे. कडेगाव पोलिसांच्या घरांचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित होता. तो आता मार्गी लागला आहे. कडेगाव शहरासह तालुक्यात विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.