सांगली जिल्ह्यातील सहा मतदारसंघांवर घराणेशाहीचा पगडा! २०१४ च्या मोदी लाटेने बदलली समीकरणे

एकेकाळी राज्याचे नेतृत्व करणाऱ्या सांगली जिल्ह्यात ३५ ते ४० वर्षांपासून घराणेशाहीचा पगडा कायम आहे. त्यासाठी जत व मिरज या दोन राखीव मतदारसंघाचा अपवाद आहे. उर्वरित सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव-पलूस, इस्लामपूर व शिराळा या सहा मतदारसंघांतील राजकारण केवळ दोन ते तीन कुटुंबाभोवती फिरताना दिसत आहे.सध्याच्या जिल्ह्यातील राजकारणात घराणेशाहीतील तिसरी पिढी सक्रिय झाली आहे. मात्र, २००९ ची मतदारसंघ पुनर्रचना व २०१४ च्या मोदी लाटेनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलत आहे. त्यामुळे नवीन चेहरे विधानसभेला पुढे येत आहेत.