शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाच ‘हे’ असेल नाव

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलं आहे. शरद पवार गटाला दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल? त्या बाबत कळवाव लागणार आहे.निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलं आहे. शरद पवार गटाला दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल? त्या बाबत कळवाव लागणार आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ हे नाव नव्या पक्षाच असू शकतं. त्याचवेळी ‘उगवता सूर्य’ या चिन्हासाठी पवार गट अर्ज करु शकतो. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ यात सीनियर पवारांच नाव आहे. त्याचा मोठा राजकीय लाभ होईल असं पवार गटातील नेत्यांना वाटतं.