आजपासून निवासी डॉक्टर जाणार संपावर…..

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या आहेत. त्या मागण्यांना राज्य सरकार वारंवार वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम करत असल्याने आता डॉक्टरांची संघटना मार्ड पुन्हा एकदा बेमुदत संपाचे हत्यार उपणार आहे. या मागण्यांबाबत दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ  यांच्यासोबत संघटनेचे चर्चा होईल.

मागण्यांबाबत सरकारच्या भूमिकेनंतर संपाचा निर्णय घेण्यात येणार आहे. वाटाघाटी फिसकटल्या तर राज्यातील सर्व डॉक्टर संध्याकाळी पाच वाजेनंतर बेमुदत संपावर जातील.निवासी डॉक्टर संघटना आणि राज्य सरकार यांच्यात आज दुपारी 2.30 वाजता मंत्रालयात बैठक होऊ घातली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्याबाबत अजित पवार आणि संघटनेमधील प्रतिनिधीमध्ये आज चर्चा होणार आहे.

यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे मार्ड आंदोलनावर ठाम आहे. आजच्या बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही तर निवासी डॉक्टर आंदोलणावर ठाम आहेत. संध्याकाळी 5 वाजता निवासी डॉक्टर भूमिका घेतील.