मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीत अन्य राज्यात वा परदेशात सुटीसाठी जायचे नियोजन असेल तर आताच विमान प्रवासाचे तिकीट बुकिंग करा. आणखी १५ दिवस जरी उशीर केल्यास तिकिटांच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता वर्तविली जात आहे.
भारतात एकूण ७५० विमाने आहेत त्यापैकी २०० विमाने सध्या बंद आहेत. त्यामुळे मागणी जास्त व पुरवठा कमी यामुळे विमान प्रवासाच्या तिकिटांचे दर गगनाला भिडण्याची चिन्हे आहेत.
गेल्यावर्षी मे महिन्यात गो-फर्स्ट कंपनीची ५६ विमाने बंद पडली. त्यानंतर आता इंडिगो एअर इंडिया, स्पाईस या कंपन्यांच्या बंद विमानांच्या संख्येची देखील त्यात भर पडत आहे.
एप्रिल महिन्यातील प्रवासाचे संभाव्य दर
(दुहेरी प्रवासासाठी)
मुंबई ते श्रीनगर २५,७१२रु.
मुंबई ते लेह १९,२३१रु.
मुंबई ते दिल्ली १०,४२९रु.
मुंबई ते चंडीगड १२,४१५ रु.
मुंबई ते गोवा ५०८५ रु.
मुंबई ते कोलकाता १४,२८८ रु.
मुंबई ते चेन्नई ६९३६ रु.
मुंबई ते बंगळुरु ७७७८रु.
मुंबई ते कोची ९३०३रू.
मुंबई ते दुबई १८,३३१ रु.
मुंबई अबुधाबी १८,४५० रु.
मुंबई ते सिंगापूर १४.५३९रु.
मुंबई ते बँकॉक १८,३११ रु.
मुंबई ते व्हिएतनाम २१,५४४रु.
वाढीचे मिळत आहेत संकेत
देशांतर्गत मार्गावर पर्यटनासाठी लोक श्रीनगर, लेह, दिल्ली, चंदीगड, गोवा, कोलकात्ता, चेन्नई, बंगळुरु, कोची आदी शहरांना पसंती देत असल्याचे दिसून आले आहे.
परदेशात जाण्यासाठी प्रामुख्याने दुबई, अबुधाबी, सिंगापूर, बँकॉक, व्हिएतनाम, लंडन आदी शहरांना पसंती देत आहेत. या सर्वच लोकप्रिय मार्गावरील दरात दिवसाकाठी हळूहळू वाढ होताना दिसत आहे.