इस्लामपुरमधील अविष्कार कल्चरल ग्रुपचा संगीत महोत्सव उत्साहात संपन्न

इस्लामपूर मध्ये माजी मंत्री आमदार तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते. तर माजी मंत्री आमदार जयवंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार आणि रविवारी अविष्कार कल्चरल ग्रुपचा संगीत महोत्सव संपन्न झाला.

अविष्काराने 21 वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण केलेली आहे.हा महोत्सव शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी व रविवार 11 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजेच दोन दिवस संगीताची मेजवानी प्रेक्षकाना अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमाला प्रेक्षकाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राजारामबापू कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, अलिका पाटील, राजवर्धन पाटील, रिया पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, ऋषिकेश लाड यांच्यासह सहा हजार रसिकांनी आनंद घेतला.

पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी आघाडीची पार्श्वगायिका असणाऱ्या पलक मुछाल व पलाश मुछाल यांचा दिल से दिल तक हा बहारदार हिंदी गीतांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट झाला.तर रविवारी लावण्यवती मेघा घाडगे, माधवी निमकर, रूपाली भोसले, तेजा देवकर, स्मृती बडदे, ऐश्वर्या बडदे या लावण्यवतींच्या ठसकेबाज लावण्या सादर झाल्या.

या पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम इस्लामपूर येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झाल्या. एकूणच प्रेक्षक वर्गाकडून खूपच चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. वर्ग या दोन दिवशी झालेल्या संगीत महोत्सव कार्यक्रमाचा अगदी आनंदाने मनसोक्तपणे आनंद घेताना दिसत होते.