मंगळवेढा शहरातील शिंदे गटाचे 16 आमदार पात्र! फटाके फोडून जल्लोष……..

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिल्याचे समजतात मंगळवेढ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा शहरातील प्रमुख चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

राज्यातील सत्ता संघर्षात शिवसेना कुणाची व बंडखोरी केलेले 16 आमदार अपात्र करावे याविषयी निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर 16 आमदार अपात्र करण्याच्या संदर्भातील निर्णय विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

सायंकाळी निकालाचे वाचन झाल्यानंतर मंगळवेढ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार यांच्या समवेत अन्य पदाधिकाराने दामाजी चौकासह शहरात प्रमुख चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पात्र ठरल्यानंतर बोलताना शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार म्हणाले की, सभापती राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालाचा संदर्भ घेत योग्य आमदार पात्र करण्याबाबत योग्य निर्णय दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा साखर कारखानदारीच्या निमित्ताने मंगळवेढ्याची संबंध असल्यामुळे मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील बेडची क्षमता वाढवणे व निंबोणीत प्रास्तावित केलेले ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित होता त्या मंजूरी देण्यासाठी त्यांनी योगदान दिले.

भविष्यात देखील मंगळवेढा शहरातील प्रमुख प्रश्नासाठी राहिलेल्या आठ महिन्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जल्लोषानंतर बोलताना सांगितले.