आता दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज

सौरऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच मंगळवारी घोषणा केली की सरकार ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करत आहे. 300 युनिटपर्यंत मोफत वीज देऊन एक कोटी घरांना वीज देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.पंतप्रधानांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ही घोषणा केली. ते म्हणाले, “शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करत आहोत.या प्रकल्पात 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देणार असून 1 कोटी घरांना याचा लाभ मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा कराल?- या नवीन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.- तुम्ही नोंदणी करताच तुमचे स्वतःचे खाते तयार केले जाईल. तुम्हाला तेथे लॉग इन करावे लागेल आणि वीज ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी यांसारखी आवश्यक माहिती विचारली जाऊ शकते, जी तुम्हाला अपलोड करून सबमिट करावी लागेल.- यानंतर तुम्हाला सरकारकडून नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी मिळेल, जे तुमच्या परिसरात उपलब्ध आहेत.- यादीतील विक्रेता निवडल्यानंतर, तुमचा अर्ज मंजुरीसाठी डिस्कॉमकडे पोहोचेल.

डिस्कॉम कडून मंजुरी मिळताच, तुम्ही सोलर प्लांट बसवू शकाल. सोलर प्लांट बसवताच, तुम्हाला प्लांटचा तपशील अधिकृत वेबसाइटवर सबमिट करावा लागेल आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.- तुम्हाला फक्त पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागेल.

योजनेची पात्रताया योजनेचा लाभ फक्त भारतीयांनाच मिळणार आहे.या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 किंवा 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.अर्ज करताना सर्व कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे.अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा.

आवश्यक कागदपत्र काय आहे?आधार कार्डपत्त्याचा पुरावावीज बिलउत्पन्न प्रमाणपत्रमोबाईल नंबरबँक पासबुकपासपोर्ट आकाराचा फोटोरेशन कार्ड