सांगली- कोल्हापुरातील पुराचे पाणी…..

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचे पाणी धाराशिव जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जागतिक बँकेचे पथक पाहणीसाठी धाराशिव जिल्ह्यात येत असल्याची माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले कोल्हापूर (kolhapur) व सांगली (sangli) जिल्ह्यातील महापुराचे पाणी वळवून धाराशिव जिल्ह्यात आणण्यासाठी आपण आग्रही होतो. याला पूरक प्रकल्पाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जागतिक बँकेचे पथक उद्या (ता. 14) धाराशिव जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे.

हे पथक कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी करेल.पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली.

या प्रकल्पाला जोडून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात वळवणेसाठी १०० किलाेमीटर बोगद्यातून पुराचे पाणी नीरा नदीत सोडण्यात येणार असून उद्धट बॅरेज मधून पुढे ते उजनी धरणात सोडले जाणार आहे.