कोल्हापूर जिल्ह्याचा पारा १८ डिग्रीपर्यंत, थंडी वाढली; ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या

जिल्ह्याचा पारा घसरला असून, सोमवारी तो १८ डिग्रीपर्यंत खाली आल्याने थंडी वाढली आहे. पहाटेपासूनच अंगाला झोंबणारे वारे वाहत असल्याने नऊपर्यंत अंगातून थंडी जात नाही. आगामी दोन दिवस असेच वातावरण राहणार असून, गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.नोव्हेंबर उजाडला तरी यंदा थंडी जाणवली नाही. ढगाळ वातावरणासह पाऊस राहिला.

त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात आता हळूहळू थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचा पारा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळी अंगात हुडहुडी भरली होती. दिवसभर उष्मा असतो, कमाल तापमान ३० डिग्रीपर्यंत जात असल्याने ऊनही खूप लागते. मात्र, सायंकाळ नंतर वातावरणात गारवा जाणवतो. रात्री दहानंतर थंडी वाढत आहे.