आटपाडी तालुक्यात ‘स्वाभिमानी’ची जोरदार तयारी…..

लोकसभा निवडणूक जवळच आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागलेला आहे. लोकसभेची आगामी
निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढविणार आहे. कोणत्याही पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आस्था दाखविली नाही. ती फक्त स्वाभिमानीने दाखवली आहे.

शेतकरी प्रश्नांसाठी केवळ आमचीच संघटना झगडत असल्याचे त्यांनी सांगितले. याच महेश खराडे पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आटपाडी तालुका पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. गाठीभेटी बैठकांवर जोर देत त्यांनी साखर पेरणी सुरू केली आहे. संघटनेच्या माध्यमातून राजकीय पटलावर त्यांनी संघटनेचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.

यावेळी तालुक्यातील दिघंची, राजेवाडी, लिंगिवरे, विठ्ठलापूर, पुजारवाडी, उंबरगाव, आटपाडी, खरसुंडी, तडवळे, करगणी, शेटफळे, हिवतडमधील विविध सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष विजय माने, जगन्नाथ मोरे, ऋषिकेश साळुंखे, प्रकाश गायकवाड उपस्थित होते.