यंत्रमाग कामगारांचे बेमुदत काम बंद……

इचलकरंजीत जास्तीत जास्त लोक हे यंत्रमाग धारक आहेत. यंत्रमाग यांची संख्या देखील खूपच आहे. यंत्रमाग कामगारांना २०१३ च्या कराराप्रमाणे प्रत्येक वर्षी मजुरीवाढ देण्याचे निश्चित झाले होते. पहिल्या काही वर्षांमध्ये मजुरीवाढ देण्यात आली. मात्र, सन २०१६ ते २०२३ अखेर गेली आठ वर्षे खिसे भरण्याचे काम यंत्रमागधारकांनी केले आहे. अशा मालकांना धडा शिकवण्यासाठी आणि आपल्या हक्काचे गेल्या आठ वर्षांतील मीटरला ६९ पैसे मिळविण्यासाठी बेमुदत काम बंद आंदोलनाची तयारी ठेवावी.

२०२४ सालची महागाई भत्त्याप्रमाणे ९ पैसे मजुरीवाढ सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी जाहीर केली आहे. त्याचे स्वागत करतो असे म्हटले आहे. इचलकरंजी यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ देण्यास यंत्रमागधारकांनी विरोध केला आहे. त्यामुळे कामगारांनी लढ्यासाठी तयार राहावे, असे आवाहन लालबावटा जनरल कामगार युनियनचे सचिव भरमा कांबळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.